१) वेगवशता
- प्राचार्य शिवाजीराव भोसले
-: कृती :-
(१) (अ) पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.
(१) जीवन विभागणारे घटक- स्थिती गती
(२) विचारांची गती म्हणजे- प्रगती
(३) अधोगती म्हणजे- दिशाविहीन गती
(४) अक्षम्य आवेग म्हणजे- अधिक वेग / विकृती
(आ) कृती करा.
(इ) कारणे शोधा व लिहा.
(१) अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते, कारण .........
उत्तर: भारतातील रस्त्यांचा तुलनेत अमेरिकेतील रस्ते हे अधिक रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी जाणारे असतात. बाजारपेठा, दुकाने, मॉल आणि रस्ते यामध्ये किमान शंभर मैलांचे तरी अंतर असते. विविध गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी तेथील लोकांना बरेच दुरवर जावे लागते. त्यामुळे अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते.
(२) लेखकाच्या मते गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा, कारण ........
उत्तर: आपल्याला लाभलेले हे अनमोल जीवन प्रदिर्घ काळ जगता यावे. ते जगत असताना कृतार्थाने जगता यावे, अनुभवता यावे. यासाठी जीवनाच भरभरून असंत मिळावी. म्हणून लेखकाच्या मते गरजेच्या वेळी वाहनाचा वापर करावा.
(२) (अ) योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा.
(१) जीवन अर्थपूर्ण होईल, जर........
(अ) वाहन कामापुरतेच वापरले तर.
(आ) वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर.
(इ) वाहनाचा वेग आटोक्या त ठेवला तर.
(ई) वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर.√
(२) निसर्ग विरोधी वर्तन नसणे, म्हणजे.......
(अ) स्वत:ला वाहनाशी सतत जखडून ठेवणे.
(आ) वाहनाचा अतिवेग अंगीकारणे.
(इ) तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे.√
(ई) गरज नसताना वाहन वापरणे.
(आ) वाहन वापरातील फरक स्पष्ट करा.
अमेरिका | भारत | |
---|---|---|
१) | घरोघरी आणि दरडोई वाहन उपलब्ध असते. | भारतामध्ये अंतर कमी, माणसे खूप आणि कामे कमी तरी सुध्दा वाहनाचा वापर केला जातो. |
२) | रस्ते रुंद,सरळ, निर्विघ्न, एकमार्गी आहेत. | स्वतःची ऐट किंवा श्रीमंती दाखविण्यासाठी उगाचच वाहनाचा वापर केला जातो. |
३) | घर, कार्यालय, बाजारपेठा यात किमान शंभर मैलाचे अंतर असते. | घरी वाहन आहे म्हणून उगाचच बरेजन फेरफटका मारून रस्त्यावर अडचणी निर्माण करतात. |
४) | विविध अंतरावरच्या गोष्टींशी संपर्क साधण्यासाठी वाहनांचा वापर करतात. | इतरांशी मानसिक स्पर्धा व आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन करण्यासाठी वाहनाचा वापर होतो. |
(३) खालील वाक्यांचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.
(अ) यथाप्रमाण गती ही गरज आहे; पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे.
उत्तर: अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक वाहनाचा वेग वाढला तर वाहनधारकाचा त्याच्यावरील ताबा कमी होतो. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर वाहनाचा वेग अनावर झाल्याने चित्ताची व्यग्रता वाढते. मनावर, डोळ्यावर, शरीरावर ताण पडतो. शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होऊन, शरीराला हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमजोर होतात. पाठीची आणि कमरेची दुखणी वाढतात. त्याचबरोबर बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे या मुक्त हालचालीचा ताळमेळ बिघडतो. त्यामुळे यथाप्रमाण गती ही गरजेचीच असते.
(आ) आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात. मग वाहने माणसांवर स्वार होतात.
उत्तर: आपल्या देशामध्ये रस्त्यावरून दोन आणि चारचाकी वाहनांची खूप अडचण आहे. त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती उपयोगी साधने ठरतात आणि वेळ, श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. परंतू अनेकजण फावला वेळ घालवावा कसा म्हणून तो घालवण्यासाठी वाहनांच्या आहारी जातात. त्यामुळे प्रथम माणसे वाहनांवर स्वार होतात. मग वाहने माणसांवर स्वार होतात.
(इ) उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये.
उत्तर: उगाच भावविवश होऊन वाहनांचा वेग वाढवला तर अनेक शारीरिक व्याधी निर्माण होतात. जर वाहनाचा वेग अंगीकारला तर शरीरव्यापारात अडथळे निर्माण करून ते निसर्गविरोधी धोरण निर्माण होते. त्यामुळे आरोग्याची हानी होते. वाढत्या वेगामुळे जीवनामध्ये अनेक ताणतणाव निर्माण होतात. त्यामुळे आपले स्वत्व आणि स्वस्थता टिकवण्यासाठी अस्वाभाविक वेग कमी करावा. उगाच भावविवश होऊन वेग वाढवला तर योग्य ठिकाणी पोहचण्यापूर्वीच आपला अंत होईल.
(४) व्याकरण.
(अ) समानार्थी शब्द लिहा.
(१) निकड - गरज, आवश्यकता (२) उचित - योग्य, न्यायसंगत
(३) उसंत - सवड, विसावा, रिकामा वेळ (४) व्यग्र - मग्न,गर्क, व्यस्त
(आ) खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.
क्र. | सामासिक शब्द | समासविग्रह | समास |
---|---|---|---|
(१) | ताणतणाव | ताण,तणाव वगैरे | समाहार द्वंद्व समास |
(२) | दरडोई | प्रत्येक डोईला(माणसाला) | अव्ययी भाव समास |
(३) | यथाप्रमाण | प्रमाणानुसार | अव्ययी भाव समास |
(४) | जीवनशैली | जीवनाची शैली जीवन आणि शैली |
षष्ठी तत्पुरुष समास द्वंद्व समास |
(इ) कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
(१) आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. (उद्गारार्थी करा.)
उत्तर: किती विलक्षण वेगवानता आढळते आजच्या जीवनात !
(२) आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे कमी आहेत. (नकारार्थी करा.)
उत्तर: आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे जास्त नाहीत.
आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे काही लांब नाहीत.
(३) निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? (विधानार्थी करा.)
उत्तर: माणसांनी निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी जायला हरकत नाही.
निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी प्रत्येक माणसाने जावे.
(५) स्वमत.
(अ) ‘वाहनांच्या अतिवापराने शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात’, तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर: वाहनांचा अतिवापर झाला तर माणसांची चिडचिड होते चित्ताची एकाग्रता वाढते ,डोळ्यावर ,मनावर , शरीरावर ताण पडतो, ताण-तणाव निर्माण झाल्यावर शरीरात अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. रस्त्याने गाडी चालवत असताना हादरे बसतात , मज्जातंतू आणि पाठीचे मणके कमकुवत होतात ,त्यामुळे कमरेची आणि पाठीची दुखणी चालू होते, बऱ्याच वेळा गाडीचा अतिवापर झाला तर जमिनीवर बसणे,उठणे, घराच्या पायर्या चढ़णे, उतरणे, चालणे,धावणे, वर-खाली पाहणे ह्या सर्व हालचाली वाहनांचा अतिवापर झाला तर शरीर व्यापारात अडचणी निर्माण होतात.
(आ) ‘वाढता वेग म्हणजे ताण’, याविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.
उत्तर: वाहनांचा वेग वाढला म्हणजे वाहनावरील ताबा कमी होतो तेव्हा मानसिक ताण निर्माण होते, आपल्या डोळ्यावर,मनावर, शरीरावर ताण पडतो . तेव्हा दिशाविहिन गती ही अधोगती ठरते. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अपघात होतात . जीवना तली ताण-तणाव वाढवून पोहोचणार तरी कुठे? आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपल्या हाती आहे व ते आपले कर्तव्य आहे. उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये कधी अनाठाई वेगामुळे एखाद्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच स्वतःचा शेवट होण्याची शक्यता असते हे सर्व अधिक वेगामुळे ताण निर्माण होते.
(इ) ‘वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते. ते वेळ घालवण्यासाठी नसते’, हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर: वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते काही वेळा तातडीचा भाग म्हणून वापर, शेतमळ्यात जायचे असेल तर, गरजे नुसार वापर करावा. वाहनांचा वेग मर्यादित ठेवला तर वेळ आणि श्रम वाचण्यासाठी उपयोगी पडतात, परंतु बऱ्याच वेळा सहज आणि सुखाने येणे-जाणे सोडून वेगाने येरझारा मारणे वाहन असेल तर मारूया चक्करा अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचण निर्माण करणे. अनाठाई वाहनांचा वापर करू नये आणि स्वतःचा जीव संकटात टाकू नये. वाहनाचा वापर उसंत म्हणून करू नये.
(ई) ‘वाहनाची अति गती ही विकृती आहे’, स्पष्ट करा.
उत्तर: आपली कामे योग्य प्रकारे पार पाडावीत, एवढाच वाहनाचा वेग असावा, त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल, तो वेग आत्मघाती ठरू शकतो, वेगामुळे माणसे बेभान होतात ,भान हरपले जाते अस्वस्थता विरून जाते, वेगात एक बेहोषी असते . यथाप्रमाण गती ही गरजेची आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही विकृती आहे.
(६) अभिव्यक्ती.
(अ) रस्त्यावरील वाहतूक कोंडीत सापडल्यावर तुमची भूमिका काय असेल ते लिहा.
उत्तर: वाहतूक कोंडीत सापडलो तर सर्वप्रथम मी माझे वाहन रस्त्याच्या कडेला उभे करीन नंतर रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण अधिकारी यांना रस्त्यावरील वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी सहकार्य करेन व वाहनचालकांना सांगेन की शक्यतोवर गरजे नुसारच वाहनांचा वापर करावा व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करेन.
(आ) वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी, ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर: वाहन चालवत असताना हेल्मेट वापरावे, वाहन चालवण्याचा परवाना, कागदपत्रे इत्यादी सोबत असणे आवश्यक आहे. वाहनाचा वेग मर्यादित पाहिजे. वाहन चालवताना शासनाने मुद्रित केलेल्या चिन्हा नुसारच वाहन वळवली पाहिजे, थांबवली पाहिजे. ज्या ठिकाणी वाहनास जाण्यास मज्जाव आहे, त्या ठिकाणी वाहन नेऊ नये. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करेन . वाहन चालवताना अतिवेग ,धाडसी कृती असे जीवघेणे कृत्य करू नये. वाहनाची योग्य ती काळजी व तपासणी करणे गरजेचे आहे .
उपक्रम :
‘वाहतूक नियंत्रण पोलीस कर्मचारी’ यांची अभिरूप मुलाखत तुमच्या वर्गमित्राच्या /मैत्रिणीच्या मदतीने वर्गात सादर करा.
उत्तर: (विद्यार्थ्यांनी मुलाखतीचे प्रश्न तयार करून सदर मुलाखत सादर करावयाची आहे. )
तोंडी परीक्षा.
‘वाहतूक सुरक्षेची गरज’ या विषयावर पाच मिनिटांचे भाषण द्या.
उत्तर: (खालील उत्तर हे नमुना म्हणून दिले असून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या भाषेत भाषणाचा प्रयत्न करू शकता. )
सध्या अपघाताच्या घटना नित्याच्या बनत चालल्या आहेत. भरधाव वाहन चालविणे आणि वाहतुकीचे नियम न पाळणे या गोष्टी अपघाताचे मुख्य कारण बनत आहेत. तरुणवर्गामध्ये धूम स्टाईलने वाहन चालविण्याची क्रेझ अशा अपघाताना निमंत्रण देत आहे. वाहतूक सुरक्षेबाबत आपल्याकडे चांगले नियम आहेत; पण ते पाळले जात नाहीत हेच दुर्दैव आहे. वाहतूक सुरक्षा हा सुरक्षित जीवनाचा मार्ग आहे, त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी आता सर्वांनी आपली जबाबदारी ओळखण्याची गरज आहे.
वेगवशता म्हणजे काय
ReplyDeletePost a Comment