Responsive Advertisement

यु-ट्युब वर आपला विडिओ अपलोड अथवा डाऊनलोड कसा कराल?




सर्व प्रकारचे निरनिराळे विडिओ पाहण्यासाठी 'यु ट्युब(www.youtube.com) ' संकेतस्थळ प्रसिद्ध आहे. यु-ट्युब वर आपला विडिओ डाऊनलोड अथवा अपलोड करण्यासाठी प्रथम आपले यु-ट्युबच्या संकेतस्थळावर खाते असणे आवश्यक आहे.

यु-ट्युबच्या वेबसाइटवर आपला विडिओ अपलोड कसा कराल?


यु-ट्युबच्या संकेतस्थळावर आपण आपल्या खात्यामध्ये लॉगिन केले की वरील बाजूस आपल्याला 'अपलोडअशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा. आता समोर येणार्या पानावर समोर आपल्याला 'ब्राऊझ'असे बटण दिसेल त्यावर क्लिक करुन आपला विडिओ इथे जोडून -ओके बटणावर क्लिक केल्यास लगेचच आपला विडिओ आपल्या खात्यामध्ये अपलोड व्हायला सुरुवात होते. हा विडिओ अपलोड होत असतानाच आपण खालील जागेमध्ये त्या विडिओ बद्दलची अधिक माहिती जसे त्या विडिओचे शिर्षकत्या विडिओबद्दलची थोडक्यात माहिती म्हणेज विषयदिनांक व मजकूर टाकू शकता.

यु-ट्युबच्या वेबसाइटवर आपला विडिओ डाऊनलोड कसा कराल?


यु-ट्युबच्या संकेतस्थळावरुन विडिओ आपल्या कॉम्प्युटरमध्ये उतरवून घेण्याला 'डाऊनलोडकरणे असे म्हणतात. पण प्रत्यक्षात यु ट्युबच्या संकेतस्थळावर त्यांचे विडिओ 'डाऊनलोडकरुन घेण्यासाठी सध्यातरी कोणतीही व्यवस्था केलेली नाही. यामुळेच  आपल्याला जर यु-ट्युबच्या संकेतस्थळावरुन विडिओ डाऊनलोड करुन घ्यायचे असल्यास इतर उपलब्ध पर्यायांची मदत घ्यावी लागते.

यु-ट्युबवरील विडिओ डाऊनलोड करण्याचे पर्याय

१. काही सॉफ्टवेअर द्वारे डाऊनलोड -अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.
२. काही संकेतस्थळावरुन ऑनलाईन डाऊनलोड -अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.
३. यु-ट्युबच्या संकेतस्थळावरुन विडिओ आपल्या मोबाईलमध्ये कसा घ्याल ?
 -अधिक माहितीसाठी www.mahazpteacher.blogspot.in 
१. सॉफ्टवेअर द्वारे यु-ट्युबवरुन विडीओ डाऊनलोड करण्यासाठी सॉफ्टवेअर
गुगल.कॉम वर 'youtube video downloader'  असे सर्च केल्यास आपणास यु-ट्युबवरुन विडीओ डाऊनलोड करण्यासाठी बरेच सॉफ्टवेअर्स सापडतील.
इथे खाली त्यातीलच एक सॉफ्टवेअर सुचविले आहे. तसेच ते डाऊनलोड करण्याची लिंक देखिल दिली आहे.
YDownloaderसॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी इथे माऊसने राईट  क्लिक करुन सेव्ह करुन घ्या.( टीप : सॉफ्टवेअर इंस्टॉलेशन तुम्हाला माहित असेलचनसल्यास कुणालातरी विचारा आणि शेवटी मला फोन करा. )
२. संकेतस्थळावरुन ऑनलाईन यु-ट्युबवरुन विडीओ डाऊनलोडगुगल.कॉमवर 'Youtube Video Download Online' असे शोधल्यास सध्या बर्याचे संकेतस्थळ उपलब्ध झाले आहेत. यातील काही उपयुक्त संकेस्थळांची यादी खाली दिली आहे.
www.keep-tube.com
www.saveyoutube.com
www.keepvid.com
www.savevideo.me
वरील संकेतस्थळांच्या सुरुवातीलाच वरील जागेमध्ये आपल्याला यु ट्युबवरील आपल्याला हव्या असलेल्या विडिओची लिंक देण्यासाठी आपल्याल एक चौकोन आढळेल. या जागेमध्ये विडिओची लिंक पेस्ट करुन बाजूच्या डाऊनलोड बटणावर क्लिक केल्यास काही सेकंदानी अथवा मिनिटांनी आपल्याला त्या लिंक च्या खालील जागेमध्ये आपल्याला विडिओ डाऊनलोड करण्याचे पर्याय दिसतील. 
उदा. विडिओचा प्रकार जसे AVI, Flash-Video, FLV, MPEG4, 3GP etc. आपण आपल्याला हव्या त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पॉपअप विंडोमध्ये अथवा ब्राऊझच्या ऍड्रेसबारच्या खाली आपल्याला विडिओ डाऊनलोड करण्याची विंडो आपल्याला दिसेल जिथे आपण आपण आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणी विडिओ ठेवू शकता.
टीप :या संकेतस्थळांवरुन विडिओ डाऊनलोड करण्याआधी आपल्या कॉम्प्युटरमध्ये 'जावाहा मोफत सॉफ्टवेअर लोड करणे आवश्यक आहे. 'जावाचा सॉफ्टवेअर आपण  www.java.comया संकेतस्थळावरुन डाऊनलोड करु शकता. आपल्या कॉम्प्युटरमध्ये जर आधीपासूनच 'जावाचा सॉफ्टवेअर टाकलेला असेल तर तशाप्रकारचा संदेश आपल्याला समोर दिसेल. तसेच वर सांगितलेल्या संकेतस्थळांवरुन विडिओ डाऊनलोड करताना पहिल्यावेळेस अथवा नेहमीच 'Always trust content from this publisher.' अशी अजून एक सुचना विचारली जाईल. ज्याचा अर्थ आपण या संकेतस्थळावर विश्वास ठेवत आहात ना! पण वर सांगितलेला 'जावाचा सॉफ्टवेअर आणि नंतरची विश्वासाची सुचना दरवेळेस त्रास देणार नाहीत.

विशेष सुचना -ऑनलाईन एखाद्या वेबसाइटवरुन यु-ट्युबचे विडीओ डाऊनलोड करताना बर्याच अशा जाहिरातीदेखिल समोर येतात ज्यावर डाऊनलोड व प्ले नाऊ असे लिहिलेले आढळेल. त्यावर चुकूनही क्लिक करु नका. या जाहिराती आहेत. त्यावर क्लिक केल्याने आपण नको तिकडे भरकटर रहाल आणि विडीओ डाऊनलोड करायचे बाजूला  राहुन जाहिरात डाऊनलोड होईल. अश्याआपल्याला बर्याच वेबसाइटवर दिसेल तिथे क्लिक करु नका. आपला वेळ फुकट जाईल.
३. यु-ट्युबच्या संकेतस्थळावरुन विडिओ आपल्या मोबाईलमध्ये कसा घ्याल ?
यु-ट्युबच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड केलेले विडिओ आपल्याला प्रामुख्यानेAVIअथवाFLVया प्रकारातील ( Format )  मधिल आढळतील. मोबाईलमध्ये सर्वसाधारणपणे थ्रीजीपी (.3GP)  या प्रकारतील विडिओ हमखास चालतात. त्यामूळे यु-ट्युबवरुन डाऊनलोड केलेले विडिओ डाऊनलोड करतानाच थ्रीजीपी करुन घ्यावेत जेणे करुन ते आपण आपल्या मोबाईलमध्ये घेऊन सहज पाहू शकता. यु-ट्युबचे विडिओ संकेतस्थळावरुन थेट थ्रीजीपी प्रकारामध्येच डाऊनलोड करुन देणार्या वेबसाइटची नावे खाली दिली आहेत.
www.ixconverter.com
www.ytconv.com
जर आपण आधिच काही विडिओ डाऊनलोड केले असतील अथवा आपल्या कॉम्प्युटरमधिल कोणतेही विडिओ आपणास मोबाईलवर पहायचे असतील तर त्यांना थ्रीजीपी या प्रकारमध्ये बदलण्यासाठी काही कन्व्हर्टर (Converter)  म्हणजेच फाईलचा प्रकार बदलणारे सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. अशाच काही मोफत फाईल कन्व्हर्टर सॉफ्टवेअरच्या वेबसाइटची नावे खाली दिली आहेत.
www.moyeamedia.com
www.need4video.com
www.xilisoft.comwww.leawo.com
      www.avito3gp.com

Post a Comment

Previous Post Next Post

Responsive Advertisement

Responsive Advertisement