Responsive Advertisement

 २) रोज मातीत

- कल्पना दुधाळ

-: कृती :-

(१) (अ) कृती करा.
                     कवितेतील स्त्री करत असलेली विविध कामे
 

(आ) संदर्भानुसार योग्य जोड्या लावा.

  ‘अ’ गट              उत्तरे               ‘ब’ गट            
(१) नाही कांदं ग, जीव लावते.(अ) स्वत:चा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते.(अ) गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते.
(२) काळ्या आईला, हिरवं गोंदते. (आ) गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते.(आ) अतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहते. 
(३) हिरवी होऊन, मागं उरते शिल्लक राहते.(इ) अतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहते. (इ) स्वत:चा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते.

(२) खालील ओळींचा अर्थ लिहा.
सरी-वाफ्या त, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
उत्तर:  शेतकरी स्त्रीच्या कष्टाचे वर्णन या कवितेत कल्पना दुधाळ यांनी चित्रित केलं आहे. त्या स्वतः शेतकरी आहेत. एक स्त्री असं एखादं घर जिव्हाळ्यानं सांभाळते. तसंच शेतही जिव्हाळ्यानं सांभाळते. भाज्या, शेत पिकवताना तिच्या कष्टाची दखल घेतली जातेच असं नाही. शेतकरी स्त्री मातीच्या वाफ्यातून, सरीतून कांदे लावते, पण ती केवळ कांदा लावत नाही तर त्या कांद्यातही ती जीव लावते. कांदा पेरल्यानंतर तो तयार होईपर्यंत त्याची निगराणी करणं, तो नीट काढणं, तो बाजारात पोहोचेपर्यत त्याची नीट देखरेख करणं या सर्वच गोष्टी ती मनापासून करते. त्याच्यावर तिचा संसार उभा राहणार असतो याची तिला कल्पना आहे. ते तिच्या उपजीविकेचे साधन आहे. त्यामुळे त्याच्यावरही ती जीव लावते. बाई मुळातच सर्व गोष्टी मनापासून करते. माया, ओढ, वात्सल्य तिच्या हृदयात असतं. माणसं असो वा पीक या सर्वांवरच ती माया करते.

(३) काव्यसौंदर्य.
(अ) ‘काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते’ या ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तरः शेतात काम करणारी स्त्री आपल्या संसारात जशी समरसून काम करते तशीच ती आपल्या शेतात मनापासून राबते. काळी माती ही तिची आईच असते. या आईची सेवा ती इमाने इतबारे करीत असते. आपल्या काळ्या आईच्या शरीरावर फुलणारं शेत बाईच्या कष्टामुळे फुललेलं असतं. गोंदण हा एक प्रकारे स्त्रीच्या संसाराचा भाग समजला जातो. पूर्वीच्या काळी स्त्रिया आपल्या कपाळावर, मानेवर, हातावर गोंदून घ्यायच्यात. कवयित्री आपल्या काळ्या मातीत जे काही पिकवते त्यामुळे त्या काळ्या आईला शोभा येते. लेक जणू काही आपल्या आईला सुंदर नटवते. असा प्रत्यय या 'काळ्या आईला हिरवं गोंदते' या ओळीत येतो. काळी आई आणि तिला गोंदवणारी तिची लेक दोन्ही पण बायकाच, थोडंसं गोंदवून घेणारी तीच, गोंदवणारी पण तीच, गोंदण खूप वेदनादायी असतं.

(आ) ‘नाही बेणं ग, मन दाबते
बाई दाबते
कांड्या -कांड्यांनी, संसार सांधते
बाई सांधते’ या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तरः कल्पना दुधाळ यांनी लिहिलेल्या रोज मातीत या कवितेत शेतकरी महिलेच्या कष्टाचे वर्णन येते. शेतात ऊस लावल्यावर ऊस लावताना उसाचे छोटे छोटे तुकडे मातीत पेरावे लागतात त्याला बेणं दाबणं म्हणतात. हे बैणं मातीत रुजलं की त्याला कोंब फुटतात आणि ऊसाचं पीक तयार होतं. बेणं जसं मातीत दाबलं जातं तसं बाईसुद्धा आपलं मन दाबते. मन मारते. आयुष्यातील सुंदर कोंब, पीक जपायचे असेल तर तिलापण तिचं मन दाबावं लागतं. मनातल्या अनेक गोष्टी माराव्या लागतात. उसाच्या काड्या, बेणं दाबून ऊसाची लागवड केली जाते. संसारासाठीसुदधा बाई काड्या जमवते आणि संसार सांधत राहते. संसाराची जुळवाजुळव करत राहते. हे सर्व करताना तिच्या मनातील हच्छा अपुऱ्याच राहतात. त्याचा गाजावाजा न करता, मन मारून आपल्या कुटुंबाकरिता ती विनातक्रार कष्ट करत राहते.

(४) रसग्रहण.
खालील ओळींचे रसग्रहण करा.
उन्हा तान्हात, रोज मरते
बाई मरते
हिरवी होऊन, मागं उरते
बाई उरते
खोल विहिरीचं, पाणी शेंदते
बाई शेंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते
उत्तर: कवयित्री कल्पना दुधाळ लिखित 'रोज मातीत' या कवितेत मातीमध्ये कष्ट करणाऱ्या स्त्रीचे मनोगत व्यक्त केले आहे. आपला संसार फुलवण्यासाठी शेतीची लागवड, राखण इत्यादी सर्व कष्टाची कामे ती करत असते. घरातील कामे आणि शेतीतली कामे दोन्ही ठिकाणी ती कष्ट करत असते. शेतकऱ्याच्या कष्टाबरोबर शेतकरी स्त्रीचे कष्ट असतात त्याची जाणीव या कवितेत कवयित्री करून देते. त्या कष्टाचे वर्णन कवयित्री या पुढील ओळी करून देते.

उन्हातान्हात काम करताना तिचा जीव थकून जातो. तळपता सूर्य, त्यात विहिरीतील पाणी शेंदणे याने तिचाही जीव मेटाकुटीला येतो. नको ते कष्ट, संसार असं तिलाही वाटत राहतं. पण तरीही तिने जीव लावलेला असतो आपल्या शेतावर, घरात, पीकावर, घरातली माणसं यांच्यासाठी ती काम करते. आपल्या मागेसुद्धा है हिरवेपण कायम रहावं याकरता पै पैका जोडून ठेवते. आपल्या मृत्यूनंतरही हे हिरवंपण राहिलं पाहिजे याकरता ती आपल्या मुलांना शेतीची काम शिकवून जाते. ती म्हणते की शेतीची काम करताना उन्हातान्हात बाई रोज मरत असते. आपल्या संसाराचा ताजेपणा, हिरवेपणा टिकून रहावा म्हणून ती पण तिच्या मनाचा हिरवेपणा टिकवून ठेवते. दोन्ही ठिकाणच्या कष्टांनी तिचा जीव थकून जातो. इतर प्रापंचिक जबाबदाऱ्या, घरातलं घरपण टिकवून ठेवता ठेवता मनालाही ताजंतवानं ठेवावं लागतं. आपल्या शेताला हिरवंगार ठेवण्यासाठी बाई खोल विहिरीचं पाणी शेंदत राहते. विहितीतून पाणी काढून ते शेताला सोडणं हे जिकिरीचं काम, विहिरीत पाणी अगदी खोलवर गेलेलं आहे ते काढताना हात, पाय, कंबर, पाठ या सर्वच अवयवांवर ताण येतो. त्याने शरीर कथकून जातं. पण तरीही कोठेही तो ताण आपल्या चेहऱ्यावर दाखवत नाही. या शेतात राबता राबता या शेतातही ती नांदत असते. शेतातला हिरवेपणा कायम रहावा म्हणून कष्ट करत ती जगते, नांदते.

(५) अभिव्यक्ती.
(अ) शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे वर्णन कवितेच्या आधारे लिहा.
उत्तर: कवयित्री कल्पना दुधाळ यांनी शेतकरी महिलेच्या कष्टाचे वर्णन 'रोज मातीत' या कवितेत केले आहे. कल्पना दुधाळ या स्वतः शेतकरी महिला आहेत. बालपणापासून शेतीच्या कामात आई वडिलांना मदत करत असल्यामुळे शेतीशी त्यांची नाळ जोडली गेलेली होती.

शेतकरी स्त्रीला घरातल्या कामांसोबत शेतीतल्या कामाचीही जबाबदारी स्वीकारावी लागते. घरातील आणि शेतीची कामं कष्टाचीच. दोन्ही ठिकाणी राबताना तिच्या इच्छा, आकांक्षा बाजूला राहतात. पण शेत, घर या दोन्हींवर तिचा जीव असल्याने ती हसत हसत या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडते. शेतात विविध कामं असतात जसे भाजणी, पेरणी, लावणी, पाणी शेंदणे, कापणी, मळणी. या व्यतिरिक्त तिला अनेक कामं असतात. शेतकऱ्याच्या बरोबरीनं शेतकरी स्त्री ही काम करत असते. कवयित्री कल्पना दुधाळ म्हणतात, कांदा असो वा ऊस त्यांची लागवड करताना शेतकरी स्त्री केवळ कांदा, ऊस लावत नाही. तर त्यांच्यावर जीवही लावते. आपली काळ्या मातीला हिरवाईने फुलून येण्यासाठी ती कष्ट करते. काळ्या मातीत पीक तरारून आल्यावर काळ्या मातीवर हिरवं गोंदण केल्यासारखं वाटतं. हे करताना रोज मातीमध्ये बाई नांदत असते. शेतकयासोबत विवाह केल्यानंतर त्याच्या घरात तर ती नांदतेच आणि त्याच्या शेतातही ती नांदते. आपल्या शेतात लावलेली विविध फुलंही शेतकरी स्त्रीची आवडती असतात. झेंडूची शेती केलेल्या शेतात झेंड्ची फुलं तोडताना तिच्याही जीवाला यातना होतात. या फुलांवर तिचं मनस्वी प्रेम असतं. त्यांना तोडताना कवयित्रीला वाटतं जणू काही या झाडांचा देहच आपण तोडत आहोत. एकीकडे या तोडलेल्या फुलांचे ती घरादाराला तोरण लावते. घर सुशोभित करते. बाईदेखील या झेंडूसारखाच आपला सर्व देह कुटुंबाकरता समर्पित करते. घरातला उत्साह कायम राहण्यासाठी तिचे सर्वत्र प्रयत्न चालू असतात. ही सर्व सुखें लाभावीत म्हणून ती मातीत राबराब राबून कामे करते. आपल्या शेतात उसाची लागवड करताना उसाचा डोळा (बेणं) मातीत ती दाबते. वेणं दाबते तसंच आपलं मनही ती दाबते. अनेक आशा, स्वप्न दाबून स्वगुखापेक्षा कौटुंबिक सुखाकडे ती लक्ष पुरवते. चिमणी ज्स काड्या, काड्या जमवून घरटं बांधते तसेच बाईपण पै पैसा जमवून, घरात लागणार्या छोट्या गोष्टी जमवून संसार उभा करते. यासाठी ती घरात, शेतात कष्ट करून नांदते.
उन्हातान्हात ही बाई कामे करून रोज मरत असते. पण शेतात, आयुष्यातला, घरातला हिरवेपणा टिकवायची काम करते. आपल्या कष्टाबाबात तक्रार न करता ते सोसून आपल्या संसारासाठी झिजत राहते. शेत पिकवता पिकवता ती स्वत:ला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करते. शेतीकरता खोल विहिरीतलं पाणी काढून शेताला पाणी पाजण्याचे काम करते. सुखसमाधानानं जगण्याचा प्रयत्न ती करत राहते. शेतकऱ्याचे कष्ट आपण लक्षात घेतो. पण घरात-दारात-शेतात राबणाऱ्या शेतकरी स्त्रीचे कष्ट मात्र विसरले जातात. या कवितेतून ती शेतकरी स्त्री आपल्या आयुष्याच्या कष्टाचा पटच आपल्यासमोर मांडतेय.

(आ) तुमच्या परिसरातील कष्टकरी स्त्रियांचे कुटुंबाच्या उदरनिर्वाहातील योगदान स्पष्ट करा.
उत्तरः माझ्या अवतीभवतीचा परिसर हा शहरी भागातला आहे.
गिरीधर निवासी संकुलात मी राहते. माझ्या शेजारच्या मावशी सकाळी घरातील सर्व कामं उरकून घरकामासाठी विविध गृहसंकुलात जातात. सकाळी ७.०० वाजता घराबाहेरील सार्वजनिक नळावर पाणी भरून, धुणी-| स्वयंपाक-भांडी ही सर्व घरातील कामं करून त्या ८.३० ला आपल्या कामांकरता बाहेर पडतात. कुणी स्वयंपाकाची कामं करतं, कुणी धुणी-भांडी तर कुणी पाळणाघराची कामं करतात. यातील काही कार्म १० १२ जणांच्या घरी जाऊन करावी लागतात. एकाच गृहसंकुलात ती कामं मिळतील असं नियोजन त्यांनी केलेलं असते. या कामाचे जे पैसे मिळतात त्यातून घरच्या आर्थिक तरतुदीसाठी या बायका मदत करत असतात. नवऱ्याच्या पगारात आपल्या कुटुंबाच्या सर्व गरजा भागत नाहीत हे लक्षात आल्यावर स्वत:हून त्या अशा कामांकरता घराबाहेर पडतात. परिणामत: त्यांच्या स्वत:च्या मुलांकडे त्यांचे काही वेळेस दुर्लक्ष होते. मुलांच्या खाण्यापिण्याकडे, आरोग्य, शिक्षण यांकडे त्या पूर्ण लक्ष देऊ शकत नाहीत. आपल्या घराला सुख, ऐश्वर्य मिळावं म्हणून या बायका सदैव कष्ट करत राहतात. यातल्या बऱ्याचशा बायका युशिक्षितही आहेत. नवऱ्याला नोकरी नाही. नवरा नाही, सासरच्या छळातून जरा मुक्तता मिळावी, पैसे कमावल्यावर सासरच्यांचा छळ कमी अशी प्रत्येकीच्या दुःखाची किनार वेगवेगळी असते. आपल्या दुःखावर त्या आपणच उत्तर शोधतात.

उपक्रम :
(अ) शेतकरी महिलेची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
उत्तरः प्रश्नावली:

(१) रमाताई, आपण शेतीच्या कामाला कधीपासून सुरुवात केली?(लग्नाआधीही करत होता की लग्न झाल्यानंतर सुरुवात केली?) 

(२) शेतीची कामे, घरची कामे दोन्ही कसे सांभाळता? 

(३) शेतीची कामे करायला आवडतात का? की गरज म्हणून करता? 

(४) शेतातील कामे करताना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते?

(५) शेतीतून किती उत्पादन मिळते? 

(६) शेतात कोणती पिके घेता? 

(७) शेतीच्या कामात कुटुंबातील इतर सदस्यांची मदत मिळते का? 

(८) तरुण पिढीला शेतीक्षेत्रात येण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी काय सांगाल? 

(९) शेतीच्या मदतीच्या दृष्टीने शासनाकडून काय अपेक्षा आहेत?

(आ) यू-ट्यूबवरील कवी विठ्ठल वाघ यांची ‘तिफण’ ही कविता ऐका.
उत्तर: विद्यार्थ्यांनी स्वतः हा उपक्रम करावा.त्यासाठी खाली दिलेले विडीओ आपणास मदत करू शकेल.



तोंडी परीक्षा.
(अ) प्रस्तुत कवितेचे तालासुरात सादरीकरण करा.
(टीप : सदर कविता पाठांतर करून विद्यार्थ्यांनी तालासुरात म्हणून दाखवणे महत्वाचे आहे.)

(आ) प्रस्तुत कवितेचा सारांश तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तर: दररोज मातीत (शेतात)कष्ट करणाऱ्या शेतकरी स्त्रीचे मनोगत 'रोज मातीत' या कवितेत व्यक्त केले आहे. या कवितेत शेतात राबणाऱ्या शेतकरी स्त्रीची वेदना, कष्ट यांचे प्रकटीकरण कवयित्री करतात. 
सरीमध्ये, वाफ्यामध्ये कांद्याची लागवड केली जाते. शेतकऱ्यांबरोबर शेतकरीसुद्धा ही लागवड करते, शेतकरी स्त्री ही लागवड करताना तिचा जीवही त्यासोबत लावते. कांद्याची लागवड करून काळ्या मातीवर ती हिरवेपणा गोंदते. पिकांचं हिरवं गोंदण काळ्या आईवर तिनं चढवलं. आपल्या घरात जशी बाई नांदते. घराचं घरपण कायम ठेवते.

शेतात झेंडूच पीक खुप आलं आहे. त्यावरील सोनेरी फुलांनी अवघं शेत सोनेरी झालंयं. ती फुलं तोड़ नये असं तिला सतत वाटत राहतं. फुलं तोडताना तिला वाटत राहतं आपण या फुलझाडांचा देहच तोडतोय. बाईचाही देह कामाच्या व्यापाने अविरत श्रमाने तोडलाच जातो. तिचं मनही तोडलं जातं. या तोडलेल्या फुलांनी ती आपल्या घराला सजवते. दाराला तोरणं बांधते. फुलांच्या सजावटीतून घराला शोभा आणते.

शेतकरी स्त्री विविध पिकांची लागवड करते. शेतात ऊसाचंही पिक लावलं जातं. ऊस लावताना उसाच्या डोळ्याच्या बाजूचा थोडा भाग असतो. उसाच्या डोळ्यासकट तो मातीत पुरावा लागतो. त्याला बेणं दावर्ण असं म्हटलं जातं. शेतकरी स्त्री हे बेणं पायाने मातीत दाबते. संसाराचे खाचखळगे भरताना अनेकदा तिला तिच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्नं विसरावी लागतात. आपल्या संसारासाठी सुगरण जशी काड्या काड्या जमवते असं शेतकरी स्त्री देखील आपला संसार काड्या काड्या जमवून सांधते.
शेतात काम कष्टाचे काम असतं. घरातलीही सर्व कष्टाची कामं, शेतातलीही कष्टाची कामं शेतकरी स्त्री करते. या कष्टांमुळे ती रोज मरणप्राय यातना सहन करते. तिला कायम हिरवं रहावं लागतं. संसार उभा करायचा तर थकून चालणार नाही. शेतात लागवड केल्यावर विहिरीतील पाणी शेंदून शेताला पाणी पाजावं लागतं. ते पाणी खोल विहिरीतून शेंदताना प्रचंड जोर लावावा लागतो, हे पाणी दणं, इतर कामं या सर्वांत ती नांदत राहते. आपल्या घरासाठी. शेतासाठी ती राब राब राबते. आपल्या ओढग्रस्त संसाराला मदत करण्यासाठी उन्हातान्हाचा विचार न करता शेतकरी महिला कांक्ष्याच्या लावणीसारखी वा उसाच्या लागवडीसारखी अत्यंत मेहनतीची कामे करत राहते. हिरवीगार शेती पिकण्यासाठी शेतकरी रोज श्रम करून, मर मर मरून, सर्वस्व अर्पण करते, तेव्हा शेतात हिरवेगार पीक येते.

5 Comments

  1. Nice तुम्ही खूप चांगले ब्लॉक टाकता यामुळे आम्हाला अभ्यास करण्यासाठी खूप मदत होते.
    यामुळे आम्ही नक्कीच बारावी मध्ये टॉप करू शकतो खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post

Responsive Advertisement

Responsive Advertisement