Responsive Advertisement


Excell Tips

excel sheet मध्ये  विद्यार्थी निकाल पत्रक तयार करणे

आज आपण excel sheet चा वापर करून निकाल पत्रक कसे तयार करता येईल हे पाहूया.
या मध्ये वापरलेल्या formula
= Sum
=Average
=IF
=Rank
=Countif
👇१) open excel sheet
👇2) first row मध्ये heading लिहा.
खालील प्रमाणे
💎A1 मध्ये अ.क्र.
💎 B1 मध्ये विद्यार्थीचे नाव
💎C1 मराठी💎D1  हिंदी💎E1 इंग्रजी 💎F1 गणित💎G1 समाजशास्त्र 💎H1 सामान्याविज्ञान💎I1 कला💎J1 कार्यानुभव💎K1 शारीरिक शिक्षण 💎L1 एकूण गुण
K1. सरासरी गुण
💎M1श्रेणी
💎N1. गुणानुक्रम
आता समजा तुमचे वर्गाची पट ४० आहे.
A2पासून A41 पर्यंत 1 ते 40 अंक लिहा
सर्व अंक type करण्याची गरज नाही .
A2 मध्ये 1 लिहा .A3 मध्ये 2 लिहा .
आता A2 व A3 दोन्ही सेल सिलेक्ट करा
A3 सेल चा खालचा उजव्या बाजकाळा + चिन्ह असेल तर त्या वार क्लिक करून A41 सेल पर्यंत ड्राग करा
म्हणजे १ ते ४० अंक क्रमाने येतील.
आता B2 ते B41  पर्यंत विद्यार्थी नाव लिहा.
या नंतर C2 ते K41 पर्यंत प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक विषयात घेतलेले गुण भरा.
पुढचे L1 मध्ये एकूण गुण लिहिले आहे त्या खाली L2 मध्ये sum function वापरा.
टीप कोणत्याही सेल मध्ये फोर्मुला वापरण्यासाठी = हे चिन्ह लिहा

त्या नंतर function नाव लिहा व पर्यायातून फोर्मुला सिलेक्ट करा
सेल L2 मध्ये
=SUM(C2:K2)
 FUNCTION मध्ये : याचा अर्थ    'ते असे होतो.
आता L2 सेल सिलेक्ट करा व काळा + वर डबल क्लिक करा
म्हणजे फोर्मुला आपोआप विद्यार्थी  आहे बाजूला जेवढे  विद्यार्थी आहे तेवढे पर्यंत ड्राग होईल.
आता सेल M2 मध्ये सरासरी काढण्यासाठी AVERAGE FORMULA वापरूया .
M2 मध्ये
 =AVERAGE(C2:K2)
 व नंतर M४१ पर्यंत ड्राग करा.
N२ मध्ये श्रेणी काढण्यासाठी
IF FORMULA वापरुया.
 N2 मध्ये
=IF(M2>90,"A1",IF(M2>80,"A2",IF(M2>70,"B1",IF(M2>60,"B2",IF(M2>50,"C1",IF(M2>40,"C2",IF(M2>33,"D",IF(M2>20,"E1",IF(M2>0,"E2",0)))))))))
टीप फोर्मुला मध्ये अक्षर असेल तर त्याचे मागे व पुढे " हे चिन्ह आवश्यक आहे.
आता O2 मध्ये गुणानुक्रम काढण्यासाठी RANK फोर्मुला वापरूया .
O2 मध्ये
= RANK(M2,M2:M41)
या फोर्मुला DIRECT ड्राग करू नका .
सेल REFERENCE बदलतो.
त्या साठी सेल लॉक करा ते असे
 = RANK(M2,$M$2:$M$41) 
लॉक साठी हे चिन्ह 4 या अंकावर आहे .
या नंतर फोर्मुला ड्राग करा .
सर्व विद्यार्थी गुणानुक्रम तुम्हाला दिसेल .
या नंतर तुम्हाला श्रेणी चे एकुणात साठी COUNTIF FORMULA वापरावे लागेल
💎ते असे
 =COUNTIf(N2:N41,"A1")
या फोर्मुला वापरून A1 श्रेणी एकूण विद्यार्थी काढता येईल .
याचा प्रमाणे प्रत्येक श्रेणीचे  विद्यार्थी संख्या  काढता येईल .
कृपया excel sheet मध्ये करुन पाहा

Post a Comment

Previous Post Next Post

Responsive Advertisement

Responsive Advertisement