३) आयुष्य...आनंदाचा उत्सव
- शिवराज गोर्ले
-: कृती :-
(१) (अ) कृती करा.
(आ) खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा.
(१) यश, वैभवही आनंद अनुभवण्याची निमित्तं आहेत. - योग्य
(२) पैशाने आनंद विकत घेता येऊ शकतो. - अयोग्य
(३) शिकण्यातला आनंद तात्पुरता असतो. - अयोग्य
(४) यशामुळे आत्मविश्वास वाढतो. - योग्य
(५) ज्यात तुम्हांला खरा आनंद वाटतो, तेच काम करा. - योग्य
(इ) हे केव्हा घडेल ते लिहा.
(१) माणसाला आनंद दुसऱ्याला वाटावासा वाटतो, जेव्हा ...
उत्तर: जेव्हा आनंद स्वतःच्या मनात मावेनासा होतो.
(२) माणूस दु:खातून बाहेर पडत नाही, जेव्हा ...
उत्तर: जेव्हा आनंदासाठी मनाची कवाडं कायमची बंद करून टाकतो.दुखाला स्वतःच्या मनाबाहेर जाऊ देत नाहीत.
(३) आनंद हा तुमचा स्वभाव होईल, जेव्हा ...
उत्तर: जेव्हा स्वतःला आनंदात राहण्याची सवय जडेल.
(४) एका वेगळ्या विश्वात वावरता येतं, जेव्हा ...
उत्तर: जेव्हा आपण एखाद्या कलेशी दोस्ती करू.
(२) (अ) खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
(१) मनाची कवाडं- मनाची दारे
विस्तृत अर्थ - मनाचे दोन प्रकार आहे एक अंतर मन दुसर बाह्य मन, अंतरंगातून खरा आनंद, टिकाऊ आनंद, प्रेम, शांती आणि समाधान हे सर्व अंतरंगातच असतं. बाह्यमन हे यश, वैभव मिळण्यात ही आनंद असतो पण यातही दुःखी असाल, उदास असाल तर बाह्य आनंद घेऊ शकत नाही. नेहमी "आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे तेव्हाच खरा आनंद गिळू शकतो त्याकरिता मनाची कवाडी सदैव उघडी ठेवावी लागते.
(२) आनंदाचा पाऊस- खूप आनंद होणे.
विस्तृत अर्थ - आनंदाचं खुल्यादिलाने स्वागत करावं लागतं. आनंद छोट्या-मोठ्या प्रसंगातून मिळतो ते आपण घेण्यावर आहे . आनंदाचा पाऊस मात्र पडू शकतो, कृत्रिम नव्हे . ... नैसर्गिक . आजच्या स्पर्धेच्या युगात कुणी मदत करेल याची वाट न पाहता स्वतःला आनंदाचे अस्तित्व निर्माण करावे लागते. एकदा आनंद घेण्याचे तंत्र जमले की मग मात्र 'नाही आनंदा तोटा' अशी अवस्था होते आणि आपल्या जीवनात आनंदाचे अनेक प्रसंग येतात.
(आ) खालील चौकटी पूर्ण करा.
(१) आनंदाला आकर्षित करणारा - आनंद
(२) शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू - श्वास
(३) बाहेर दाराशी घुटमळणारा - आनंद
(४) आनंदाला प्रसवणारा - आनंद
(५) आनंद अनुभवण्याची निमित्तं - यश, वैभव
(३) व्याकरण.
(अ) खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा.
(१) एवढं मिळवूनही मी आनंदात का नाहीये? - प्रश्नार्थी वाक्य
(२) ‘गोडधोड’ हे सुद्धा पूर्ण ब्रह्मच असतं की! - उद्गारार्थी वाक्य
(३) आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. - विधानार्थी वाक्य
(आ) योग्य पर्याय निवडा व लिहा.
(१) माणसं स्वत:चा छंद कसा विसरू शकतात?
या वाक्याचे विधानार्थी वाक्य-
(अ) माणसं स्वत:चा छंद नेहमी विसरतात.
(आ) माणसं स्वत:चा छंद लक्षात ठेवतात.
(इ) माणसं स्वत:चा छंद विसरू शकत नाहीत. √
(ई) माणसं स्वत:चा छंद किती लक्षात ठेवतात.
(२) हा आनंद सर्वत्र असतो. या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य-
(अ) हा आनंद कुठे नसतो? √
(आ) हा आनंद कुठे असतो?
(इ) हा आनंद सर्वत्र नसतो का?
(ई) हा आनंद सर्वत्र असतो का?
(३) किती आतून हसतात ती! या वाक्याचे विधानार्थी वाक्य-
(अ) ती आतून हसतात.
(आ) ती फार हसतात आतून.
(इ) ती आतून हसत राहतात.
(ई) ती खूप आतून हसतात. √
(इ) खालील तक्ता पूर्ण करा.
(ई) खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.
(१) स्वत:च्या आवडीचे काम निवडा. - कर्तरी प्रयोग
(२) लोकांना पेढे वाटणं वेगळं. - भावे प्रयोग
(३) कष्टाची भाकर गोड लागते. - कर्तरी प्रयोग
(उ) ‘आनंद’ या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा.
उत्तर:
➤खरा (आनंद) ➤शुध्द (आनंद) ➤खरा (आनंद)
➤टिकाऊ (आनंद) ➤आत्मिक (आनंद) ➤अनोखा (आनंद)
➤वेगळा (आनंद) ➤निखळ (आनंद) ➤सत्य (आनंद)
➤शाश्वत (आनंद)
(४) स्वमत.
(अ) ‘जे काम करायचचं आहे, त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतं’, या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
उत्तर: प्रत्येकजण आनंद मिळावा म्हणून धडपडत असतो. पण कित्येकांना तर आनंद म्हणजे काय? हेच माहीत नसते असे आपल्याला त्यांना बघितल्यावर वाटते. सर्व असूनही एखादी व्यक्ती आनंदी नसते. कारण आनंद मिळवण्यासाठी आनंद मनात असावा लागतो. तो छोट्या छोट्या गोष्टीतून घेता आला पाहिजे.
एखाद्या ध्येयानं, स्वप्नानं झपाटून जाणं आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटून प्रयत्न करणं हेच माणसाचं जगणं आहे. पण या प्रयत्नांतही आनंद असतोच. तो घेता आला की आनंदासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. ज्याला आनंदी आयुष्य जगायचं असेल त्याने तेच क्षेत्र निवडावं ज्यात स्वत:च्या आवडीचं काम करायला मिळेल पण काही वेळा हे शक्य नसतं. हवं तेच काम मिळतं असं नाही. पण अशा वेळी 'जे काम करायचं आहे त्यात आनंद घेण्यास शिकणं हेही शक्य असतं.' आपण आसपास कित्येक माणसं आनंद घेत काम करताना बघतो. त्यांच्याकडून हे आपण शिकले पाहिजे. भले आवडीचे काम मिळाले नसेल पण तिथे आवडीचे सहयोगी असू शकतात. मुळात आपण छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याकडे आहेत त्यात आनंद शोधला तर आपण आनंद घ्यायला शिकतोच.
(आ) ‘सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर: कोणाला कोणती गोष्ट आवडेल, सुंदर वाटेल ते सांगता येत नाही. प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो. एखाद्याला एखादी जुनी गोष्ट टाकाऊ, खराब वाटेल तर एखाद्याला तीच गोष्ट जतन करण्यायोग्य सुंदर वाटेल, उपयोगी वाटेल. म्हणजेच सौंदर्याची एक अशी व्याख्या करणं शक्य नाही. एखादयाला एखादी व्यक्ती का सुंदर वाटते याची प्रत्येकाची विविध कारणे असू शकतात. काही बाह्यसौंदर्यावर भर देतात तर काही आत्मिक, म्हणूनच सौंदर्य पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं. तसाच आनंद हा घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. एखादयाकडे पैसा, मूलबाळ, सर्व काही असतं तरी नेहमी ती व्यक्ती त्रागा करताना, दुःख करताना दिसते. तर एखादा माणूस सामान्य जीवन जगत असतो पण नेहमी हसरा, आनंदी असतो. कारण तो आपल्याकडे काय नाही याचे दु:ख करत न बसता असलेल्या गोष्टींमधून आनंद शोधत असतो. प्रत्येक छोट्या छोट्या क्षणाचा आनंद उपभोगत असतो. म्हणूनच आनंद हा देखील घेणाऱ्याच्या वृत्तीवर अवलंबून असतो.
(इ) ‘आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं’, या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तर: काही व्यक्ती सतत त्रासलेले चेहरे घेऊन फिरताना दिसतात. अनेकवेळा आपल्याला प्रश्न पडतो की यांना हसता येते की नाही? अशा अनेक व्यक्तींनी आपल्या जीवनातील काही घटनांनी आनंदाचे दरवाजेच बंद केलेले असतात, ते आनंदाला आपल्या जीवनात शिरकावच करू देत नाहीत, नाही माझे जीवन असेच आहे आणि मी ते असेच मन मारून जगणार असे जणू त्यांनी ठरवूनच टाकलेले असते. आयुष्यात चढउतार, सुखदुःख येत असतातच पण म्हणून त्याच गोष्टी धरून बसून आयुष्य थांबवून ठेवायचे नसते. दुःखातही काही क्षण सुखाचे वाट्याला येत असतात, त्याचे खुल्या दिलानं स्वागत करता आलं पाहिजे. मनात कोणतेही भ्रम निर्माण करून जगत राहण्यापेक्षा छोट्या गोष्टींमधून आनंद शोधला पाहिजे. लहान मुले क्षणात रडतात. क्षणात हसतात कारण त्यांचे मन निरागस असते. त्यात कोणतीही पूर्वकर्ता नसते. तसेच आपणही प्रत्येक क्षण त्याप्रमाणे जगायला शिकलं पाहिजे. मनाची कवाडं उघडून आनंदाला मनात शिरू दिले पाहिजे. माणूस आनंद मिळवायला शिकेल तेव्हा तो खरा आनंदी होईल म्हणूनच, 'आनंदाची खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं.'
(ई) ‘प्रत्येक माणसाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे अत्यंत गरजेचे आहे’, तुमचे मत लिहा.
उत्तर: आनंदाला आपण सर्वत्र शोधत असतो. पण तो अंतरंगातच असतो. ज्याला याची जाणीव असते त्याला तो अंतरंगातच सापडतो. आनंदाचं भान जागृत ठेवणं हेच आनंदाचं रहस्य आहे. आपण आपले अस्तित्व गृहीत धरून चालतो. आपल्या अस्तित्वाची साक्ष देत असतो तो श्वास. आपल्याला त्याचंही भान नसतं. श्वासांचा बोट धरून मनापर्यंत पोहोचला ग्रेते. मनाशी नातं जोडता येतं. आयुष्यातला एकेक क्षण येतो आणि जातो. सूर्योदय, सूर्यास्त होतो, त्याकडेही आपण नीट लक्ष देत नाही. आपण प्रत्येक गोष्ट गृहीत धरतो. त्यामुळे आपल्या आजूबाजूला बदलण्याच्या निसर्गाचं, घटकांचं आपल्याला भान नाही. औचित्य नाही. त्यामुळे त्यांचा आनंद घेत येत नाही. या सर्वांचे कौतुक बधण्यासाठी दृष्टीचं, श्वासाचं, अस्तित्वाचं, अस्तिवाच्या आनंदाचं भान असणे गरजेचे आहे. युगायुगांनंतर मनुष्य जन्म लाभतो असे म्हणतात. मग आपणाला हा जन्म लाभला आहे हे आनंदाचे कारण नाही का? आपल्या अस्तित्वाचा आनंद आपण उपभोगलाच पाहिजे.
(५) अभिव्यक्ती.
(अ) खरा, टिकाऊ आनंद मिळवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर: खरा टिकाऊ आनंद हा अंतरंगातून येतो. बाह्य यश, वैभव मिळवण्यातही आनंद असतो. पण जर तुम्ही यात दुःखी असाल, उदास असाल तर बाह्य यश तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. भरपूर सुख, वैभव मिळवूनही माणसाला आनंद मिळत नाही. अशावेळी माणसाला वाटतं मला अजून काही मिळवायला हवं. एवढं असूनही मी आनंदात का नाही? अशावेळी माणसाला विरंगुळा हवा असू शकतो. आपल्याला काय हवं आहे? प्रेम, शांती, समाधान है सगळे अंतरंगात असतंच. आनंद जर 'मानता' येत नसेल तर तो 'मिळवायचा' कशाला? अधिक सुखाचे दिवस यावेत. यासाठी अधिक मिळवायला हवं; पण हवं असणं म्हणजे हाव असणं नसावं. पैसा मिळाल्यानं आनंद होतो. तो आनंद पैशाचा नसतो. तो आपण कमावलेला असतो. पैशाशिवाय जो आनंदी राहू शकतो. तोच पैशानं अधिक आनंद घेऊ शकतो. यश, वैभव, कीर्ती मिळाल्याने नक्की काय होतं? तर अंतरीचा आनंद द्विगुणित होतो. पण मुळातच आनंद शून्य असेल तर? शून्याला कितीही मोठ्या यशानं, पैशानं गुणलं तरी गुणाकार शून्यच येतो. यश, वैभव ही आनंदाची कारणं नव्हेत. आनंद अनुभवण्याची निमित्तं आहेत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. पैशानं आनंद विकत येत नाही. कारण खरा आनंद विकाऊ नसतोच, टिकाऊ असला तरच तो खरा आनंद असतो. म्हणून खरा टिकाऊ आनंद मिळवण्यासाठी माणसाने आनंद छोट्या छोट्या गोष्टींतून शोधला पाहिजे व प्रत्येक गोष्टीत आनंद मानायला, अनुभवायला शिकलं पाहिजे.
(आ) तुमचे जीवन आनंदी होण्यासाठी तुम्ही काय काय कराल, ते लिहा.
उत्तर: आनंद हा विकत घेता येत नाही. तो मागून मिळत नाही. तो माणसाच्या मनात असावा लागतो. एखाद्याला बक्षीस मिळाल्यावर जर तो त्याला माझ्यापेक्षा जास्त बक्षीसे मिळाली म्हणून मनात विचार करत राहिला तर स्वत:ला मिळालेल्या बक्षीसाचाही तो आनंद घेऊ शकणार नाही. तसेच एखाद्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या कार्यक्रमाचा आनंद घेण्याच्या ऐवजी आता कार्यक्रम संपल्यावर रिक्षा मिळेल का? घरी जाऊन काय कामं आहेत? याचा विचार करत बसलो तर कार्यक्रमाचा आनंद मिळणार नाही. म्हणजेच आनंद घेता आला पाहिजे. मी माझ्या जीवनातील छोट्या छोट्या घटनांचा आनंद घेण्याचा प्रयत्न करेन. माझ्याकडे काय आहे. त्याचा आनंद घेईन. जे आहे ते माझं आहे. दुसऱ्याकडे काय आहे याचा विचार करत मी का जगावं? रोज दिवसात छोटे छोटे आनंदाचे खूप क्षण येत असतात. त्याचा आनंद घेईन. आवडीचे क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न करेन आणि ते ही शक्य झालं नाही तरी जे आहे त्यात आनंद मानत पुढे वाटचाल करेन. अजून मिळविण्याचा प्रयत्न जरूर करेन पण त्यासाठी आज आनंदात जगणे विसरणार नाही, मला वाटते ही गोष्ट प्रत्येकानेच आत्मसात केली पाहिजे.
उपक्रम :
प्रस्तुत पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांची यादी करा. त्यांसाठी वापरले जाणारे मराठी शब्द लिहा.
उत्तर: (१) टेन्शन - tension- ताण
(२) इस्टेट - estate - मालमत्ता
(३) लॅन्डस्केप्स - landscapes - चित्रे रेखाटण्याची कला
(४) डॉक्टर - doctor - वैद्य, चिकित्सक
* तोंडी परीक्षा.
(अ) खालील वाक्प्र चारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा.
(१) आभाळाकडे डोळे लावणे. - पावसाची आतुरतेने वाट पाहणे.
वाक्य - मुग कोरडाच गेल्याने सर्व शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.
(२) विसर्ग देणे. - सोडून देणे.
वाक्य - जीवन वाटचालीत अपयश, निराशेच्या क्षणांना विसर्ग दिल्याशिवाय प्रयत्नांना प्रारंभ होत नाही.
(आ) ‘माझ्या जीवनातील आनंदाचे क्षण’ या विषयावर पाच मिनिटांचे भाषण सादर करा.
उत्तर: माझ्या जीवनातील आनंदाचे क्षण
सन्माननीय परीक्षक व माझ्या विद्यार्थी बंधु भगिनींनो. माझ्या जीवनातील त्या आनंदमय क्षणाच्या अविस्मरणीय स्मृती तुमच्यासमोर मांडण्याची संधी या उपक्रम निमित्ताने परीक्षकांनी मला दिली, त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे विशेष असे आभार मानतो. त्यांना मनापासून धन्यवादही देतो.
जीवनप्रवासात 'आनंद' हा प्रत्येकालाच हवा असतो. पण आपला आनंद नेमका कशात आहे हेच अनेकांना कळत नसतं. जीवनावर, आपल्या जगण्यावर प्रेम केल्याशिवाय हा 'आनंदाचा गाव' अनेकांना सापडत मात्र नाही. दैनंदिन जीवनातल्या छोट्या-छोट्या गोष्टीतही आनंदाचा सूर सापडणे महत्त्वाचे आहे. हा सूर शोधा आनंदात जगा. मग सर्वत्रच 'आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे'चा अनुभव नक्कीच तुम्हांला येईल. आपल्या जीवनात आनंदाचे क्षण वारंवार येत राहावे असे प्रत्येकाला मनोमन वाटत असते, जीवन गाणे आनंदाने गात राहावे असे प्रत्येकालाच वाटत असते. अनेकदा जीवनात अपेक्षित गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत. मग आपण आनंदी रहाणं सोडून द्यायचं का? माझ्या मित्र मैत्रिणींनो याचे उत्तर नाही असेच आहे. आनंदी राहाणं सोडून दिलं तर आपलं जीवन निरस आणि कडवट होऊन जाईल. जगण्याच्या धडपडीतली सगळी मज्जाच निघून जाईल. आपल्या आयुष्याला आनंदी क्षणांनी अक्षरश: भरून काढणं आपल्याच हातात आहे.
काहीजण कोठेही बँड वाजताना दिसला की, लगेच त्या ठिकाणी जाऊन इतरांसोबत नाचायला लागतात. लग्न कोणाचं आहे? लोक आपल्याला काय म्हणतील याचा विचार न करता मनमुराद नाचण्याचा आनंद ते शोधतात व मिळवतात सुदधा. ज्या ठिकाणी आनंद मिळेल त्या ठिकाणी जाऊन, इतरांशी समरस होऊन आनंदाचे क्षण आपण अनुभवले पाहिजेत हेच खरे!
दुसऱ्याच्या आनंदात सहभागी झाल्याने आपल्याला आनंद नक्कीच मिळतो. आपले मित्र, नातेवाईक, शेजारी, परिचितांकडे आनंदाच्या क्षणी जाऊन आपण त्यांच्या आनंदात सहभागी होऊन आनंदी व्हावं हे आपल्याच हातात आहे. इतरांचा प्रत्येक आनंद हा आपलाच आनंद आहे असे समजा. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होऊन आनंदी राहायला शिकले तर आपले जीवन आनंदी नक्कीच होईल. इतरांच्या आनंदात आपण आपला आनंद शोधला तर इतरांनाही आनंद नक्कीच होईल. 'आनंदची अंग आनंदाचे' हेच सत्य आहे. वाढदिवसाच्या दिवशी प्रेमळ शुभेच्छांच्या वर्षाव एक अनोखा आनंद नक्कीच मिळतो. शुभेच्छा, शुभ आशीर्वादाने जगण्याला एक वेगळा ऊर्जा नक्कीच मिळते. आवर्जून आठवणीने दिलेल्या शुभेच्छा, साधलेला संवाद खूप महत्त्वाचा. पावसात भिजल्याशिवाय भिजण्यातला आनंद मिळत नाही. नवनवीन गोष्टी शिकण्यातला आनंद कधीतरी घेऊन पहा. अरे! हे तर आपल्याला छान जमते ही गोष्ट, हा विचार तुमच्या मनाला विलक्षण समाधान देऊन जातो. निसर्गाशी एकरूप झाल्यावरच एका विलक्षण सौंदर्याचा साक्षात्कार होतो. कधीतरी लहान मुलांत लहान बनून खेळा. बालपणाच्या स्मृती जागवा व एक अनोखा आनंद अनुभवा. आनंद घेण्याची वृत्ती महत्त्वाची. आवड असेल तर सवड नक्कीच मिळते. भविष्याची भीती न बाळगता वर्तमानात आनंद अनुभवता येणे, यासाठी भरभरून जगणे महत्त्वाचे. निस्वार्थ भावनेने मदतीला धावून जा. संकटसमयी एखाद्या आधार बनून पाठीशी उभे राहून पहा. आनंदाचं भान जागृत ठेवून जगणं महत्त्वाचं, आनंदाचा अनमोल ठेवा आपल्या मनातच असतो, पण कस्तुरीमृगासारखे त्याला शोधण्यासाठी आपण धावत असतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा, यापुढचा तुमचा जीवनप्रवास आनंदमयी असावा अशा मनःपूर्वक शुभेच्छा! शेवटी एकच सांगतो, माझ्या जीवनातील 'ते' आनंदाचे क्षण मोजकेच परंतु तरीही महत्त्वाचे अविस्मरणीय स्मृतिरूपात चिरकाल राहणारे एक नवी उर्जा देणारे!
It's very helpful sir 👌👌 thanks
ReplyDeletePost a Comment